उज्ज्वल शिक्षण मंडळ, रत्नागिरी संचलित

आचार्य द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट

कला, विचार आणि मूल्यांचा सर्जनशील प्रवास
भारतीय परंपरा आणि आधुनिक डिझाईन शिक्षणाचा संगम

Admissions Open

About आचार्य

आचार्य द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट ही उज्ज्वल शिक्षण मंडळ, रत्नागिरी संचलित एक सर्जनशील शिक्षणसंस्था आहे. येथे कला ही केवळ विषय नसून जीवन समजून घेण्याची प्रक्रिया आहे. ड्रॉईंग, डिझाईन, रंगसंगती, कॉम्पोझिशन यांसोबतच विचारस्वातंत्र्य, संवेदनशीलता आणि व्यक्तिमत्व विकास यांवर विशेष भर दिला जातो.


Director’s Thought

Prof. Sandesh Palaye Director Aacharya Applied Art College

आजच्या काळात शिक्षण म्हणजे केवळ पदवी किंवा नोकरीची तयारी इतक्यावर मर्यादित राहू नये, असा माझा ठाम विश्वास आहे. शिक्षणाने माणूस घडला पाहिजे. त्याची संवेदना, विचारशक्ती आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी विकसित झाली पाहिजे. कला म्हणजे केवळ हाती असणारे कौशल्य नाही; तर ती मन आणि समाजाशी संवाद साधण्याची भाषा आहे. कलाकार फक्त डिझाईन तयार करत नाही, तर तो संस्कृती, विचार आणि मूल्ये घडवत असतो. गेल्या १५ वर्षांपासून कला शिक्षण, अभ्यास आणि प्रत्यक्ष अध्यापन क्षेत्रात कार्य करताना विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील या गरजा जवळून अनुभवता आल्या. त्या अनुभवातूनच आचार्य द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्टची संकल्पना आकाराला आली आणि ही संस्था उभी राहिली. आचार्यची स्थापना करताना आमचा उद्देश एकच होता कि, विद्यार्थ्यांना माहिती नव्हे, तर अनुभव द्यायचा; स्पर्धा नव्हे, तर सर्जनशीलता द्यायची; आणि करिअरसोबतच व्यक्तिमत्व ही घडवायचे. प्राचीन भारतीय गुरुकुल परंपरा आणि आधुनिक डिझाईन शिक्षण यांचा संगम साधत आम्ही असे कलाकार घडवू इच्छितो. कलाकार कौशल्यवान तर असतीलच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे संवेदनशील आणि जबाबदार नागरिक असतील.

– प्रा. संदेश पालये
संस्थापक व संचालक

भेट द्या | संवाद साधा

आचार्य द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट मध्ये शिक्षण म्हणजे केवळ वर्ग नाही, तर संवाद, अनुभव आणि मार्गदर्शन आहे. प्रवेश, अभ्यासक्रम किंवा करिअर संदर्भात अधिक माहितीकरिता आमच्याशी थेट संपर्क साधा.